पैठण तालुका मुद्रण संघाचा दर वाढीचा निर्णय

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण तालुका मुद्रण मुद्रण संघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत विविध मुद्रण व्यवसायाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बदलत्या बाजारपेठेच्या परिस्थितीचा आणि वाढत्या तांत्रिक स्पर्धेचा विचार करून, सर्वानुमते नवीन दर निश्चित करण्यात आले.

छपाई करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या भावात दरवाढ झाल्यामुळे पैठण शहरातील मुद्रण व्यावसायिक हतबल झाला आहे. या दरवाढी संदर्भात मुद्रण संघाचे पैठण तालुकाध्यक्ष सचिन उंडाळे व बाळासाहेब काटे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत छपाई  करण्यासाठी लागणाऱ्या फ्लेक्स मीडिया पेपर, शाई, पेपर यांसह आदी वस्तूंच्या दरवाढी बाबत तसेच मुद्रित करून ग्राहकांना कमी वेळात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पैठण शहरात विविध मुद्रणालय उपलब्ध आहेत. मात्र दर निश्चिती करण्यात आलेली नव्हती व त्याचे पालनही कोणी करत नव्हते त्या अनुषंगाने व दर निश्चिती करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

यामध्ये दरवाढी संदर्भात विविध ठराव एकमताने पारित करण्यात येऊन दरवाढीचे दर निश्चित करण्यात आले. या बैठकीत सर्व सदस्यांनी  सकारात्मक विचारमंथन करून उत्तम
निर्णय घेतले. आगामी काळात मुद्रण व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि नवीन योजना राबविण्याचा संकल्पही करण्यात आला. यामध्ये मुद्रानालयात दरपत्रक फलक दर्शनी भागात लावणे, वाहतूक खर्च, मुद्रण, कामगार खर्च, बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले की जर दरांबाबत कुठल्याही ग्राहकाला दर तोडून दिल्यास त्या प्रिंटिंग प्रेस मालकाकडून वीस हजार रुपये सक्तीचा दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
सर्व दुकानदारांनी आपली ओळख पत्र, आधार कार्ड, स्वाक्षरीसह अध्यक्ष यांच्याकडे जमा करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी संतोष मुळे, किशोर सदावर्ते, रविंद्र ठोसर, योगेश टेकाळे, दिगंबर नलावडे, गणेश माने, आदित्य तुपे, योगेश मात्रे, अभिषेक शिंदे, सचिन ओटे, इमरान गाजी, तन्जिम मोर्वे, सुनिल सवणे, शुभम शर्मा, कचरू साळुंके, विठ्ठल आगलावे, शंकर गलधर, योगेश फासाटे, कुलकर्णी पेंटर, नेमाणे पेंटर, भानुदास प्रिंट्स, अरूण दिंगे, आविष्कार भुरूळे, रोहित औटे, भागवत डुकरे, अशोक दसपूते, आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.